महाराष्ट्र

BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजपने मुंबईत शिवसेनेच्या जागा वाढवल्या, तरीही एकनाथ शिंदे अडले, नेमकं काय घडलं?

BMC Election 2026

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाकडून भाजपकडे 100 जागांची मागणी करण्यात आली आहे.

BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना-मनसे युतीची (Shivsena MNS yuti) घोषणा केली. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने मुंबईतील मराठी व्होटबँक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. हा धोका ओळखून आता भाजपने (BJP) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी 227 पैकी फक्त 52 वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आता राज-उद्धव यांच्या युतीनंतर भाजपने शिंदे गटाला जास्त जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपने शिंदे गटाला 52 वरुन 70 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, भाजपच्या या प्रस्तावावरही शिवसेना नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. (Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!